अपात्र संस्थांकडे रस्ते सफाईच्या कामासाठी राजकीय दबाव?, महापालिकेतील मोठ्या अधिकाऱ्याच्या प्रेमापोटी ‘सेटिंग’
![Political pressure on ineligible institutions for road cleaning work?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/अपात्र-संस्थांकडे-रस्ते-सफाईच्या-कामासाठी-राजकीय-दबाव_.jpg)
पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘अ’पारदर्शी कारभार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नेते आणि महापालिकेतील मोठा अधिकारी संगनमताने अपात्र संस्थेला रस्ते सफाईचे काम देण्यासाठी ‘सेटिंग’ करीत आहेत. परिणामी, भाजपाच्या पारदर्शी कारभाराच्या रस्ते सफाईच्या कामात ‘चिंधड्या’ उडाल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाने रस्ते/गटर्स यांची खासगीकरणाद्वारे किमान वेतन दराने तसेच साफसफाई साहित्यासह कामगार उपलब्ध करुन साफसफाई करण्याकरीता पुरवण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे कामाच्या सादर केलेली बँक गॅरंटी खोटी असल्याबाबत मे.राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था.मर्या. या संस्थेला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, महापालिकेची फसवणूक केलेप्रकरणी नि.नो.क्र.७/२ व ७/५ या २ कामांसाठी संबंधित संस्थेला अपात्र ठरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित बँक प्रशासनाने राजलक्ष्मी संस्थेने खोटी बँक गॅरंटी दिल्याचे कळवले आहे. मात्र, संबंधित संस्थेला महापालिका प्रशासासने केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून बोळवण केली आहे. तसेच, संबंधित बँक गॅरंटीबाबत खोटी माहिती दिलेले काम संपले आहे. त्यामुळे संबंधित संस्थेवर कारवाई करता येणार नाही, अशी पळवाट प्रशासनाकडून काढली जात आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा संस्था आहे. या संस्थेच्या अधिकृत पदाधिकारी भाजपाच्या नगरसेविका आणि महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे आहेत. याच संस्थेला रस्ते सफाईच्या कामात ‘ठेका’ मिळावा. यासाठी सत्ताधारी भाजपातील मोठा नेता राजकीय दबाव निर्माण करीत आहेत.
लोकप्रतिनिधी-प्रशासनाचा एकमताने काळा कारभार..
विशेष म्हणजे, महापालिकेतील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या प्रेमापोटी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून अपात्र असलेली आणि नगरसेविकांच्या संस्थेला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याहून पुढे संबंधित अपात्र संस्था पात्र करावी. यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या ‘काळा कारभार’बा