Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

Corona Vaccine | बेळगावात बँड- बाजाच्या गजरात आरती ओवाळत कोरोना लसीचं स्वागत

Coronavirus Vaccine देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात आणि तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केलं जात आहे. पण, बेळगावकरांचं स्वागताची तयारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

बेळगावमध्ये लसीचं जंगी स्वागत करण्यात आलं. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सीरमच्या कोविशिल्ड लस आणणाऱ्या वाहनाने कर्नाटक हद्दीत प्रवेश केला. वाहनानं हद्द ओलांडताच पोलीस बंदोबस्तात लस आणणारं हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आलं. तिथं सुवासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली. आरती केल्यानंतर वाहनातील लसी तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आल्या. लस येण्याच्या आनंदात इथं बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनावर मात करण्यासाठीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सध्याच्या घडीला 1 लाख 47 हजार लसी बेळगावात आल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button