Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी सामना वाचल्यानंतर संजय राऊत म्हणाले…

जर चंद्रकांत पाटील हे सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील असा टोला शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लगावला आहे. सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली होती. यानंतर शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निशाणा साधला.

“चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. आज ते वाचायला लागले हिच मोठी बाब आहे. जर ते सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होती. सकारात्मक दृष्टीकोनातून ते महाराष्ट्र आणि देशाकडे पाहतील. सामना वाचत राहतील तर त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांना येईल,” असं राऊत म्हणाले.

वाचाः पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी “ड्राय रन”चे आयोजन

“मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो,” असं पाटील म्हणाले होते. यावर शिवसेनेने पुन्हा वार करत त्यास सडेतोड उत्तर दिले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button