Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ५ हजार २२९ नव्या रुग्णांची नोंद

  • मुंबईत १३ हजार ७५४ तर पुण्यात १९ हजार ५५३ एक्टिव्ह रुग्ण

मुंबई – गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६ हजार ७७६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १७ लाख १० हजार ५० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट ९२.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, राज्यात गेल्या २४ तासांत १२७ मृतांची नोंद झाली असून मृत्यूदर २.५८ झाला आहे. हे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर २७ मृत्यू हे मागील आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button