आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत युवकांचा ओघ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/4.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील युवा कार्यकर्ते राजेश आरसूळ यांनी आज शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
प्रवेश सोहळा पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने उपस्थित होते. आरसूळ यांच्या प्रमुख कार्यकर्ते आणि मित्र परिवारातील अनिल सौन्दडे, डॉक्टर सचिन कसबे, प्रथमेश आरसूळ, संतोष कसबे, महादेव शेळके, अनिलकुमार अनीवाल, बालाजी बोरसे, संजय चोळसे, अविनाश आरसूळ, सुरज चांदणे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना युवकांना संधी देणार आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी सांगितले. खासदार बारणे म्हणाले, निवडणूक लढवताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजते, संघटन कसे मजबूत केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धतीत बदल होणार आहेत. त्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न केले तर निवडणूक लढवणे अवघड जाणार नाही असे ही त्यांनी सांगितले.
सामान्यांच्या न्याय, हक्कासाठी लढणार
राजेश अरसुळे यांनी 2017 ची महापालिका निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यांना तिस-या क्रमांकी मते मिळाली होती. सामाजिक कार्याद्वारे त्यांनी चिंचवडगाव, वेताळनगर परिसरात चांगला जनसंपर्क वाढविला आहे. शिवसैनिक म्हणून काम करताना वंचित, गरीब, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. शहरात पक्ष वाढीसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मनापासून काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राजेश अरसुळे यांनी व्यक्त केली आहे.