Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण वाढले, ५०१ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45,209 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 43,493 रुग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 90,95,806 वर पोचली आहे. सध्या 4,40,962 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. आतापर्यंत 85,21,617 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचा बरे होण्याचं प्रमाण 93.69% आहे.





