ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

शिक्षण विश्व: ग्रंथ दिंडी, कविता, नाट्य व भारूड सादरीकरणातून मराठी संस्कृतीचा जागर

‎पिंपरी- चिंचवड | चिंचवड येथील ‎कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड येथे प्राचार्याच्या प्रोत्साहनाने आणि मराठी विभागाच्या प्रा सुरेखा कुंभार यांच्या पुढाकाराने मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषा, साहित्य व सांस्कृतिक परंपरेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथ दिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे ग्रंथ हातात घेऊन घोषणाबाजी करत मराठी भाषेचा गौरव केला. यानंतर सभागृहात सरस्वती वंदना आणि महाराष्ट्र गीत सादर झाल्यावर प्रा सुरेखा कुंभार यांनी प्रस्ताविक केले. महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषेचे महत्त्व सांगून मराठी भाषेचे संवर्धन करणे हीं प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगितले. यानंतर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी प्रभावी कविता सादरीकरण करत मराठी साहित्याची समृद्ध परंपरा उलगडून दाखवली.

हेही वाचा       :            मोरया नगरमध्ये भुयारी केबलचे काम अखेर मार्गी!

कार्यक्रमाला संस्थेचे मान्यवर व्यक्ती उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक, व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‎संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा, डॉ. तेजल शहा यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.डॉ रवींद्र निरगुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद..!

‎विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला उपस्थितांची विशेष दाद मिळाली. तसेच पारंपरिक लोककलेचा वारसा जपणारे भारूडचे सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या उपक्रमातून मराठी संस्कृतीची ओळख नव्या दम्याच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. ‎हा कार्यक्रम सर्व शिक्षकांच्या, विद्यार्थाच्या उस्फुर्त सहभाग व सहकार्याने यशस्वी पार पडला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button