Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपा ओबीसी मोर्चा सांगली जिल्हा प्रभारीपदी वीणा सोनवलकर यांची नियुक्ती

पुणे । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर यांची सांगली जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले. सांगली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे वर्चस्व असून येणाऱ्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला भाजपशी जोडण्याचे काम वीणा सोनवलकर यांच्यावर सोपविण्यात आले आहे.
वीणा सोनवलकर म्हणाल्या की, सांगली ग्रामीणमध्ये जावून तेथील सर्व समाजांची मोट बांधून येणाऱ्या काळात या समाजाचे प्रश्न हाती घेवून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून ते सोडविण्यात येतील. तसेच सांगली मधील सर्व ओबीसी घटकांना संघटित करण्याचे काम या मध्यातून करण्यात येईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button