पुण्यातील पावसाने घेतले तीन बळी; ओढ्याला आलेल्या पुरामुळं दुर्घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/rajegav-1200_202010505083.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात कालपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसानं पुणेकरांची झोप उडवली आहे. दोन तासात पडलेल्या पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण केली होतीय. दौड तालुक्यातील राजेगाव येथे ओढ्याला आलेल्या पुरात काल संध्याकाळी दोन दुचाकीवरील चौघे जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघेजण खानवटे या गावचे असून राजेगाव येथे कामासाठी आले होते. रात्री घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात ते वाहून गेले आहे. ते चौघे जण दोन दुचाकीवरुन ओढ्यावरून चालले होते. वाहून गेलेल्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर अद्याप एकाचा शोध सुरू आहे. इतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडले. रात्री नऊ ते अकरा या दोन तासात संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कात्रज भागात काल रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगरला ९६ मिलीमीटर पाऊस पडला. कात्रज तलाव, टांगेवाला कॉलनीसह आणि अरणेश्वर परिसरातील नागरिकांना घरात पाणी शिरल्याने प्रशासनाला महापालिकेच्या शाळेत हलवावे लागले.