breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीव्यापार

Good News: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

नवी दिल्ली: देशांतर्गत बाजारात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे सोने-चांदीच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळालेली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या सोन्याचा वायदा भाव 1 टक्क्याने वाढून 51,399 रुपये प्रति तोळा झालेली होती. तर चांदीच्या किंमतीमध्ये 1.5 टक्के वाढ झालेली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी भारतामध्ये सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळालेला आहे. तरी देखील 7 ऑगस्ट रोजी 56000 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर आता सोन्याची किंमत जवळपास 5000 रुपयांनी कमी झालेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची तेजी

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी वाढलेले आहेत. डॉलरचे उतरलेले मुल्य आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) द्वारे आणखी कमी व्याजदर होण्याबाबतचे संकेत मिळाल्यामुळे सोने मजबुत झाले आहे. अमेरिकेत सोन्याचा वायदे भाव 2 टक्क्यांनी वाढलेले आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,974 डॉलर प्रति औंस होते. गुरुवारी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पावेल (Fed Chairman Jerome Powell) द्वारे नवीन रणनीतीबाबत देण्यात आलेल्या भाषणानंतर सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी घसरलेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button