Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ganeshotsav.jpg)
मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. तसेच, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. गिरगाव चौपाटीपाठोपाठ तुलनेत लहान असलेल्या दादर आणि माहिमच्या चौपाट्यांवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश नाकारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे.
त्यासाठी लगतच्या रस्त्यांवर लोखंडी मार्ग रोधक उभारुन चौपाटीवर जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. परिणामी भाविकांना घरी, सोसायटीच्या आवारात अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे लागणार आहे. समुद्रावर येणाऱ्या भाविकांना विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे.