मुंबईत ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता; मात्र मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/mumbai-rains-pti-final-1593864551.jpg)
उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसानं मागील काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण असून, थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता असून, महापालिकेनं बुधवारी मुंबईतील २० टक्के पाणीकपात ही १० टक्क्यावर आणली आहे.
हवामान विभागानं येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.
मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून मुंबई १० टक्के पाणीकपात लागू राहणार असल्याचं मुंबई पालिकेने म्हटलं आहे. जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्याट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली.