Breaking-newsराष्ट्रिय
चेन्नई शहरातील तब्बल ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/WhatsApp-Image-1-1.jpeg)
चेन्नई – बैरुतमध्ये अमोनियम नायट्रेटमुळे झालेल्या भीषण स्फोटाचा बोध घेत चेन्नई शहरातील एका गोदामात असलेल्या ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव करण्यात आला. हा स्फोटक केमिकलचा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे.
कस्टम विभागाने २०१५ साली एका आयातदाराकडून हा अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला होता. चेन्नईपासून २० किमी अंतरावर असलेल्या फ्राईट स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेट भरलेले कार्गो ठेवण्यात आले होते. हा केमिकलचा साठा ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्याच्या जवळपास १२ हजार लोकांची वस्ती होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होती.
बैरुतमधील स्फोटानंतर प्रशासनाला जाग आली असून, चेन्नईतील ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव करण्यात आला. यातील काही कंटेनर हैदराबादला रवाना झाले आहेत.