शहरातील 550 थुंकीबहाद्दरांवर पालिकेची दंडात्मक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/20Spitting.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांना मास्क लावण्याचे आव्हान केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एक हजार नागरिकांवर महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ५५० जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियमावली जाहीर केली आहे. तसेच मास्कचा वापर करण्याचे निर्बंध घातले आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर पालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ ग ‘ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ‘ ग ‘क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे मार्गदर्शनाखाली संजय कुलकर्णी, राजू बेद, आरोग्य निरीक्षक शेखर निंबाळकर, सुरेश चन्नाल, अतुल सोनवणे, सदाशिव पुजारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.