पिंपरी-चिंचवडमध्ये 9 जुलैचा ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार का?

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रत्येक रविवार व गुरुवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन महापालिकेने केले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू आवश्यक असून नागरिकांनी याची दखल घ्यावी. विनाकारण घराबाहेर न पडता जनता कर्फ्युला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.मात्र या आवाहानचा पिंपरी-चिंचवडकरांवर काही परिणाम झाल्याचं चित्र पहायला मिऴत नाहीये.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक रविवारी व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या शनिवारी केले होते. मात्र, गेल्या रविवारी म्हणजे 5 जुलैला जनता कर्फ्यूचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला. दुकाने खुली होती. नागरिक, वाहने रस्त्यावर दिसत होती. त्याबाबत “जनता कर्फ्यू’चा आदेश शनिवारी रात्री काढल्यामुळे आम्हाला माहितीच नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटली होती. त्यात सत्यता आहे, पण, उद्या म्हणजे गुरुवारी देखील जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता उद्या तरी जनता कर्फ्यू पाळला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, काहीही असले तरी, कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सर्व नागरिकांनी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळावा, असे आवाहन काही नागरिकांनीही केलं आहे.
चिंचवड गावातील काकडे पार्क, तानाजीनगर, केशवनगर या भागांसह चिंचवड स्टेशन, आनंदनगर, लिंकरोड, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, इंदिरानगर भागात रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा किमान आठ दिवस पुर्णपणे स्वंयस्फूर्तीने लॉकडाऊन, स्वंय क्वारनटाईन, स्वंय संचारबंदी पाळावे, असे आवाहन काही नागरिकांनी केले होते. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. आनंदनगर जवळपासून अडीच महिन्यांपासून कंटेन्मेंट झोन आहे. चारही मार्गावर पोलिस बंदोबस्त आहे. तरीही चिंचवड गावातील काही लोक या लॉकडाऊनला फारस गंभीर घेताना पहयला मिळत नाहीये.





