breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

#CoronaVirus: ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला बालेकिल्ला ओकलाहोमातून अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवला आहे. पहिल्याच प्रचार रॅलीमध्ये ट्रम्प यांनी चीनला निवडणुकांचा मुद्दा म्हणून उचलून धरला आहे. ‘कोरोना’ला 19 नावे दिली जाऊ शकतात, आपण त्याला ‘कुंग फ्लू’ म्हणू शकतो, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनवर शरसंधान साधले आहे.

ट्रम्प यांनी याआधीही ‘वूहान व्हायरस’, ‘चायनीज व्हायरस’ अशा शब्दात वंशभेदी टिपण्णी केली होती. आता चीनी मार्शल आर्ट प्रकार ‘कुंग फु’वरुन श्लेष साधत ‘कोरोना’ला ‘कुंग फ्लू’ असे संबोधले आहे.

ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही निशाणा साधला. “बिडेन हे कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या हातातील असहाय्य बाहुली आहेत. आम्हाला रोखण्यासाठी ते प्रत्येक दिवशी हिंसाचार आणि लूटपाट करत आहेत. दंगेखोरांना रसद पुरवत आहेत. स्मारके, प्रतिमा यांची नासधूस करुन आपला इतिहास नष्ट करु पाहत आहेत. त्यांच्या मागण्यांशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते शिक्षा ठोठावू पाहत आहेत” असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button