breaking-newsक्रिडा

विंडीजचे क्रिकेटपटू ओल्ड ट्रॅफर्डमध्ये बायोसिक्युअर सुरक्षेसह क्वॉरंटाइन

लंडन | विंडीजची टीम कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका ८ जुलैपासून सुरू होत आहे. टीमला सध्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये बायोसिक्युअर सुरक्षेसह क्वॉरंटाइन केले. या मैदानावर अखेरच्या दोन कसोटी खेळल्या जातील. लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या या मैदानावर सुरक्षेची चांगली व्यवस्था केली. खेळाडू ज्या रूममध्ये थांबले आहेत तिला स्मार्टफोनने उघडता येते. अशात खेळाडूंना त्यांना स्पर्श करण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत कडक नियम बनवण्यात आले आहेत. क्लबचे प्रकल्प संचालक स्टीव्ह डेव्हिसने म्हटले की, खेळाडू व कर्मचारी येण्यापूर्वी सर्व स्वच्छ करण्यात आले आहे. हे कसोटी संपेपर्यंत चालेल.

आरोग्य तपासणी, कोविड-१९ चाचणी आणि तापमान तपासणीसाठी वैद्यकीय कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आम्ही कमीत कमी लोकांमध्ये जेवणाची सुविधा देतोय. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यास त्याला आयसोलेशन करण्यासाठी खोल्या तयार केल्या. येथे आरोग्यासंबंधी संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. त्यांनी म्हटले, खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून प्रत्येक एका खोलीत एका खेळाडूला ठेवण्यात आले.

वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने म्हटले की, टीम कोविड-१९ महामारीमध्ये पैशासाठी इंग्लंड दौऱ्यावर आलेली नाही. उलट परिस्थिती सामान्य करण्यासाठी हा एक प्रकारचा प्रयत्न आहे. होल्डरने म्हटले की, ‘अनेकांना क्रिकेटचे पुनरागमन पाहिजे. असे नाही की, आम्ही बळीचा बकरा बनू इच्छितो. आमचा उन्हाळ्यात ब्रिटनचा दौरा करण्याचा सुरुवातीपासून कार्यक्रम निश्चित होता. आम्ही सर्व शक्यतांवर चर्चा केली. हे आमच्यासाठी पैशाच्या संबंधित प्रकरण नाही. आम्हाला सुरक्षा हवी आणि योग्य व्यवस्था असेल तर आम्ही त्यावर अमलबजावणी करू.’ होल्डिंगने वर्णभेदविरोधी आंदोलनामुळे त्याच्या संघावर होणाऱ्या परिणामावरदेखील चर्चा केली. अमेरिकेत मूळ आफ्रिकन जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button