breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप; सत्ताधारी भाजपा चौकशी अन्‌ कारवाई करणार!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कोरोनाच्या अटकावासाठी केल्या जाणाऱ्या सर्वच उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहेत. मास्क, औषध, यंत्रसामुग्री खरेदी, वॉर रुम, फेसबुक लाईव्हत देखील भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. यावर प्रशासनाने भ्रष्टाचार केला असेल, तर आम्ही कारवाई करणार आहोत, अशी भूमिका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केली आहे.

सीएसआर फंडातून मिळालेल्या पीपीई किट देण्यातही घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागात रुग्ण सापडत आहेत. परंतु, या महामारीत देखील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची कमाई जोरात सुरु असल्याचा आरोप होत आहे. कारण, कोरोनाच्या आपत्तीत मास्कसह अनेक पुरवठादार सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीशिवाय आयुक्त श्रावण हर्डीकर एकही निर्णय घेत नाहीत. अनागोंदीला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दीड कोटीची मास्क खरेदी वादात सापडली आहे. झोपडीधारकांना मास्क देण्याकामी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या संस्थाकडूनच पंधरा लाख झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी केली आहे. एका मास्कची किंमत दहा रूपये ठरविण्यात आली. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता दहा रूपये प्रति नग या किमतीने तब्बल दीड लाख मास्क करारनामा न करता थेट पद्धतीने पुरवठा धारकांकडून खरेदी करण्यात आले.

कोविड-19 वॉररुमवर ४७ लाख रुपयांचा खर्च…

सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या नगरसेवकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मास्क पुरविल्याचा आरोप आहे. त्यावर महासभेत विरोधकांसह काही सत्ताधारी नगरसेवकांडूनही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. साडेआठ कोटीची औषधे, यंत्रसामुग्री खरेदीदेखील वादात सापडली आहे. स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही वॉर रुमवर 47 लाखाची उधळपट्टी केली आहे. केवळ साडेतीन तासाच्या फेसबुक लाईव्हसाठी तब्बल तीन लाख रुपये मोजले आहेत. साबण, सॅनिटायझर खरेदीतही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसेच सीएसआर फंडातून मिळालेल्या पीपीई किट देण्यातही घोटाळा केल्याच आरोप झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button