breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदा कोरोनामुळे पायी दिंडीच्या भव्य सोहळ्यामध्ये खंड, 50 लोकांच्या उपस्थितीत सोहळ्याची सुरवात…

महाराष्ट्रात सुमारे 300 ते 400 वर्षांपेक्षा जुनी असणारी परंपरा म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पायी निघणारी वारी . मात्र यंदा कोरोनामुळे या भव्य सोहळ्यामध्ये खंड पडला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकार सोबत झालेल्या चर्चेमध्ये सुवर्ण मध्य काढत वारकर्‍यांनी कोरोना व्हायरसचं जागतिक संकट पाहता पायी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये काही बदल केले आहेत.सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करत यंदा पालखी सोहळा पार पडणार आहे..तसंचअवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/1587637481400963/

महाराष्ट्रात आज संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून प्रस्थान ठेवणार आहे. अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. परंपरेनुसार यावर्षी वैष्णवांच्या मेळाव्यात पालखी निघणार नाही. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे मंदिराला प्रदक्षिणा घालत पालखी मंदिरामध्येच राहणार आहे. तर दशमीला पादुका रवाना केल्या जाणार आहेत. उद्या म्हणजे 13 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान होणार आहे. मात्र ते देखील मर्यादित स्वरूपातच असेल.सध्या देहुत प्रस्थान सोहळ्याचे कीर्तन सुरू..

https://www.facebook.com/watch/?v=570671777215041

आज औरंगाबादमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान होणार आहे. पैठण मध्ये अवघ्या 20 जणांना उपस्थितीत हा सोहळ होणार आहे. आज पैठण मध्ये 12 च्या सुमारास दिंडी सोहळ्याला सुरवात करण्यात आली आहे. वारकरी तल्लीन होत दरवर्षी पायी वारीला सुरूवात होत असते. मात्र यंदा सारीकडे सुन्न वातावरण असल्याचं पहायला मिळत़य. दरम्यान ही पालखी मंदिरामध्येच राहणार आहे. नाथवाड्यामध्ये हा सोहळा संपन्न होईल.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/791641738036984/

दरम्यान 1 जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्याने 30 जून पर्यंत पालखी मंदिरामध्येच राहील. तर सरकारच्या पुढील आदेशाप्रमाणे दशमीला पंढरपुरला पादुका घेऊन जाऊन त्याचं पूजन केलं जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button