Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोल्हापूरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोल्हापूरातील कंनाननगर ध्ये राहणारा ३६ वर्षीय वयाचा रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाने मुंबई येथून ट्रकने प्रवास केल्याची माहिती आहे. त्याला टायफाइड होता. कोल्हापूर येथे काल पहाटे आल्यावर तो सी पी आर रुग्णालयात तपासणी साठी आला असता त्याला दाखल करून त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आता प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. त्याला नुकतेच करोना बाधित रुग्ण कक्षात हलवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. साठ वर्षाचे हा वृद्ध इचलकरंजी येथील रहिवाशी होता.




