Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील ४५ जिल्ह्य़ांत एकही रुग्ण नाही

देशातील २३ राज्यांमधील ४५ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. अशा जिल्ह्य़ांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत (नारंगी श्रेणी) समावेश केला जातो. पुढील १४ दिवसांमध्येही नवा रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे करोनामुक्त मानले जातात. एकूण करोनाबाधितांपैकी ४२९१ रुग्ण (२९.८ टक्के) मरकज निजामुद्दिनशी निगडित आहेत.
करोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू ६० वर्षांहून अधिक वयोगटांतील आहे. ८३ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेहासारखा आजार असल्याचे आढळले आहे. ४२.२ टक्के मृत्यू ७५ वर्षांहून अधिक वयोगटांतील तर, ३३.१ टक्के मृत्यू ६०-७५ वयोगटांतील आहेत. १४.४ टक्के मृत्यू ४५ वर्षे वयोगटांतील रुग्णांचे असून १०.३ टक्के मृत्यू ४५-६० वयोगटांतील आहेत.





