Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
राज्यात ४८ विशेष न्यायालयांचा सरकारचा विचार -गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई | महाईन्यूज
महिला अत्याचार नियंत्रणासाठी राज्य सरकार संवेदनशील असून महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांत जलद न्याय मिळावा यासाठी दिशासारखा कायदा याच अधिवेशनात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच राज्यात ४८ विशेष न्यायालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी मुख्य न्यायमूर्तीशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
महिला अत्याचाराबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर दिले आहे. अहमदनगरमधील घटनेत महिनाभरात चौकशी अहवाल मागवला आहे, तर मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरील महिला अत्याचाराच्या चौकशीचे काम गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे सोपवण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.





