Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरणी जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिकांचं सूचक ट्विट; म्हणाले…

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं. समीर खान यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे”.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button