मुंबईत विरोध तर अमरावतीत समर्थन, नागरिकत्व कायद्यावरुन महाराष्ट्रात दोन चित्र

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन रान पेटले आहे. हा कायदा मंजूर झाल्यापसाून मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि हिंसाचार झाल्याचे पाहिले. तर अनेक संघटनांनी, विद्यार्थ्यांनी त्यासोबतच राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरत या कायद्याला विरोध दर्शवला.
आज (26 डिसेंबर) मुंबईतही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढला आहे. तर अमरावतीमध्ये भाजपच्या नेतृत्वात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाथ मोर्चा काढण्यात आला आहे. देशभरातून या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला आहे. त्यासोबत आता देशातील अनेक ठिकाणाहून नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाथ मोर्चे निघू लागले आहे. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नुकतेच या कायद्याच्या समर्थनाथ नागपुरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता.





