दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी संचारबंदी

दिल्ली | महाईन्यूज |
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलं आहे. सुरुवातीला आसाम आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचं लोण आता देशभर पसरलं आहे. आज शुक्रवारीही दिल्लीमध्ये या कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलनाच्या शक्यतेमुळे दिल्लीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.दिल्लीतील जामा मशीदबाहेर हजारोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले आहेत. भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी सर्व आंदोलकांना जंतर मंतर येथे जमण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. दिल्लीतल्या 12 पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी बस जाळण्यात आल्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. जे लोक अशा कृत्यात सामील होत आहेत ते देशद्रोही आहेत असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतील त्यांची संपत्ती जप्त करून त्या संपत्तीचा लिलाव करून त्यातून सरकारचं नुकसान भरून काढलं जाईल असंही ते म्हणालेत.

दिल्लीत अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशन बंद होते. या कायद्याच्या विरोधकांचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळली जाईल. आणि धर्माला नागरिकत्वाचा आधार मानता येणार नाही. त्यामुळे सरकरचा हा निर्णय भारतातीयांची एकता संपवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांचं म्हणनं आहे,.. मात्र मोदींनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत, लोतांच्या मनात या विधेयकाबाबत विरोधी पक्षानं अनेक गैरसमज निर्माण केल्याने हा वाद पेटला असल्याचंही मोदींनी म्हटलं…





