Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे
आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sucide_2017082133-3.jpg)
पिंपरी – हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला.
पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. सोमवारी रात्री तिने राहत्या घरात गळफास घेतला. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या नागरिकांना याबाबत संशय आल्यानेत त्यांन हिंजवडी पोसिांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडल्या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान, पूजाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.