breaking-newsपुणे

भारतीय नाेटा पाहण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकाने लांबविले २४ हजार रुपये

पुणे : तुर्कीस्तानचे नागरिक असल्याचे सांगून भारतीय चलनी नोटा कशा प्रकारच्या असतात हे पहायचे असल्याचे सांगून ५० हजार रुपयांच्या बंडलमधील हातचलाखी करुन २४ हजार ५०० रुपये काढून घेणाऱ्या इराणी नागरिकास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.  महंमद शमसाबाद अबोलफझल (वय २८, रा़ तेहरान फार्दीस, इराण) असे त्याचे नाव आहे. तो व त्याची पत्नी रेशमा अहमदी फिरोज सह तो जून २०१९ पासून टुरिस्ट व्हिसावर भारतामध्ये आलेला आहे. इतके दिवस तो दिल्लीत रहात होता. १७ नोव्हेंबर पासून तो पत्नी व मुलासह पुण्यात आला असून ढोले पाटील रोडवरील एका तारांकित हॉटेलमध्ये राहत होता.

याबाबतची माहिती अशी, येरवडा येथील सनसिटी चौकातील मेडिकल दुकानात १८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघे पतीपत्नी आले. त्यांनी आपण तुर्कीस्तानचे नागरिक असल्याचे सांगून भारतीय चलनी नोटा कशा प्रकारच्या असतात, हे पहायचे आहे, असे सांगितले. दुकानदाराने त्यांना गल्ल्यातील ५०० व २ हजार रुपयांच्या चलनी नोटा असलेल्या ५० हजार रुपयांचे बंडल दाखविले. त्याने बंडल हातात घेऊन ते हातळण्याचा बहाणा करुन त्यातील २४ हजार ५०० रुपये काढून घेतले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button