breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाई लादण्याचा आयुक्तांना अधिकार कोणी दिला?, बोलविता धनी कोण?

  • राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांचा सवाल
  • दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय अयोग्य

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पवना धरणात मुबलक पाणी असताना दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकरांनी आज घेतला. यापूर्वीपासून नागरिकांना कृत्रीम पाणी टंचाईचा मारा सहन करावा लागत आहे. आता ही टंचाई असह्य झाली असताना पूर्णवेळ पाणी पुरवठ्याचा निर्णय अपेक्षीत होता. त्यातच आयुक्तांनी हा निर्णय घेऊन नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आयुक्तांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे पिंपळे सौदागर येथील कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवडची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलै २०२० पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. तरीही, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येत्या २१ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. तरी, प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आडमुठे धोरण अवलंबले. हा निर्णय घेताना आयुक्तांनी कोणालाच विश्वासात घेतले नसेल तर हा निर्णय एकाकी कसा घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिली पाहिजे, असे संदीप काटे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

शहरावर कृत्रिम पाणीटंचाई लादण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?, तुमच्या या धोरणाचा एक पिंपरी-चिंचवडकर या नात्याने मी जाहीर निषेध करतो. येत्या काही दिवसात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्या. अन्यथा तुमच्या या निर्णयाने शहरावर पाणी संकट ओढवल्यास शहरातील एक जबाबदार नागरिक या नात्याने पुढील होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल, असा खरमरीत इशारा देखील काटे यांनी दिला आहे.

प्रशासनाकडून टॅंकर लॉबी पोसण्याचा उद्योग

शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. बहुमजली सोसायट्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आधीच एक दिवसीय पाणीकपातीच्या निर्णयाने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या हुकूमशाहीमुळे ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो’, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. पवना धरणात १०० टक्के पाणी असताना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. ही घटना शहरात प्रथमच घडत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असताना देखील नागरिकांवर टँकरने पाणी घ्यावे लागले. टँकरवाल्यांना पोसण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे का?” असा सवाल काटे यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button