breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भाजपसोबत ‘घरोबा’ कदापि नाही; शदर पवार यांनी शक्यता फेटाळली

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची चर्चा असताना शरद पवार हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात सत्तास्थापनेबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचं बिनसलं आणि त्यामुळे निवडणुकीआधी बॅकफूटवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. कारण शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता दिल्लीच्या राजकारणात नवी चर्चा जोर धरत आहे.

भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे. तसंच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचं आश्वासनही दिलं आहे, असं वृत्त एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीसह इतर काही माध्यमांनी दिलं आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या या कथित ऑफरबद्दल अद्यापपर्यंत कोणत्याही नेत्याने अधिकृत भाष्य केलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button