ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/raj-thakrey-696x435.jpg)
भाजपचा व्यंगचित्रातून राज ठाकरेंना चिमटा
मुंबई – विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काही वेळातच भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख या व्यंगचित्रात चक्क “सोंगटी’ असा करण्यात आला आहे. “राज’मान्य खेळ असा मथळा या व्यंगचित्रात देण्यात आला आहे.
राज ठाकरेंबाबतच्या या व्यंगचित्रात राज ठाकरे ठिक्कर या खेळाच्या मधोमध उभे आहे, असे दाखवण्यात आले आहे. 2004च्या चौकटीत शिवसेना, 2009च्या चौकटीत मनसे, 2014च्या चौकटीत भाजप दाखवण्यात आली आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या दोन चौकटी दाखवण्यात आल्या. त्यामध्ये राज ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे 2019ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे. त्यामध्ये प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले असून राज ठाकरेंना सोंगटी असे संबोधण्यात आले आहे.