breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 900 नव्या कोरोनाचे पाॅझिटिव्ह रुग्ण

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात 894 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 900 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 159 नवीन रुग्ण सापडले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पाच जणांचा आज मृत्यू झाला. वाकड येथील 59 वर्षीय पुरुष, निगडीतील 67 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 73 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 54 वर्षीय पुरुष आणि वाल्हेकरवाडीतील 44 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 15 हजार 648 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 6 हजार 481 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1885 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 790 अशा 2675 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1633 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1296 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 72 हजार 835 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4601 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button