पिंपरी / चिंचवडपुणे

गुळ व साखरेचा 9 हजार 628 किलोचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुणे l प्रतिनिधी

हवेली तालुक्यात कोलवडी येथील मे. बोरमलनाथ गुळ उद्योगातील गु-हाळावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत भेसळीच्या संशयावरून 98 हजार 240 रुपये किंमतीचा 3 हजार 70 किलो गुळ आणि 2 लाख 29 हजार 530 रुपये किंमतीची 6 हजार 558 किलो साखर असा 9 हजार 628 किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. ध. झांजुर्णे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गु-बाळावर धाड टाकली. यापुढे देखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून नागरिकांनी अन्न भेसळीबाबत 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी,  असे आवाहन परिमंडळ तीनचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.

गुटखा विक्रेत्याकडून 10 लाखाचा साठा जप्त

परिमंडळ पाचचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर, रा. भि. कुलकर्णी यांच्या पथकाने आज (गुरुवारी, दि. 9) पहाटे 5 वाजता गुटखा विक्रेता राजु मलबारे यांच्या घरासमोरील वाहनामधून 10 लाख 44 हजार 400 रुपयांचा पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुगंधीत सुपारी साठा जप्त केला. कारवाईत 7 लाख रुपये किंमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले असून यवत पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी गुटखा, पानमसाला विक्रीबाबत 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन नारागुडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button