breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

करोना संकटात नरेंद्र मोदी २७ तारखेला पुणे दौऱ्यावर?

पुणे |महाईन्यूज|

करोना संकटामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर धीम्या गतीने निर्बंध शिथील करण्यात आले. पण एकीकडे करोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत २७ नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळत आहे.

“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button