TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
  • आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने नियोजन

पिंपरी । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू करण्यात आलेला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे भोसरीत लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये परिसरातील ३४ शाळांतील सुमारे ८ हजार विद्यार्थी- पालकांनी सहभाग घेतला.

नवी दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियमवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना परीक्षा विषयी असलेल्या अडीअडचणी़ंवर समस्यांवर मार्गदर्शन करण्याबाबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात देशभरातील सुमारे ३८ लाख विध्यार्थी- पालकांनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवडसह भोसरी परिसरातील विद्यार्थी- पालक आणि शाळांना एकाच ठिकाणी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होता यावे. याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठा एलईडी स्क्रीन आणि आसन व्यवस्था करण्यात आली होती.

यामध्ये एसपीजी इंग्लिश मीडिअम स्कूल, अमृता विद्यालय, यमुनानगर, निगडी, मॉर्डन विद्यालय, निगडी, टागोर विद्यालय, स्वामी समर्थ मराठी माध्यम शाळा, समता विद्यालय, स्वामी समर्थ सेमी इंग्रजी स्कूल, स्वामी समर्थ इंग्लिश व सीबीएसई बोर्ड, इंद्रायणीनगर, भोसरी कन्या विद्यालय, शिव छत्रपती विद्यालय, प्रियदर्शनी इंग्रजी माध्यम व सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी, एसपी इंटरनॅशनल, प्रियदर्शनी स्टेट बोर्डचे विद्यार्थी, एसपीएस इंटरनॅशनल स्कूल, संत साई स्कूल, श्रीराम विद्यालय, श्रीराम विद्यालय, गायत्री इंग्लिश मीडिअम, प्रीतम प्रकाश महाविद्यालय, ज्ञान सागर विद्यालय, एसएनजी इंग्लिश स्कूल आदी विविध शाळांमधील विद्यार्थी, पालकांनी सहभाग घेतला, अशी माहिती राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे सचिव मनोज मराठे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हे एक चर्चा सत्र आहे. ज्यात विद्यार्थी-शिक्षक-पालक आपल्या शैक्षणिक अडचणी पंतप्रधान यांच्यासमोर मांडु शकतात. त्यावर कुठलाही प्रश्न विचारू शकतात. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच असा मोठा कार्यक्रम झाला. ज्यातील सुमारे ८ हजार विद्यार्थी सहभागी झाले.
– मनोज मराठे, सचिव, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना.

भोसरीसह पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांना एकाच ठिकाणी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होता यावे याकरिता आम्ही आसन व्यवस्था आणि लाईव्हची व्यवस्था केली. भाजपाचे पदाधिकारी आणि शिक्षकांच्या सहकाऱ्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे. परीक्षा काळातील तणाव व्यवस्थापन, अडचणी याबाबत मार्गदर्शन मिळते. ‘‘कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असेल तर ते धोकादायक ठरते.’’ हा कानमंत्र आज पंतप्रधानांनी देशवासीयांना दिला आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button