ताज्या घडामोडीमुंबई

मेट्रोसाठी ६२५० कोटींची तरतूद ; ‘एमएमआरडीए’चा १८,४०४.६३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या १८,४०४.६३ कोटी रुपयांच्या सुमारे ७६७९.९३ कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. नगर विकास मंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ िशदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी ६,२५० कोटी रुपयांची अशी भरीव तरतूद करण्यात आली असून सागरी मार्ग, रस्ते सुधारणा प्रकल्प, उन्नत रस्ते, पूर्व द्रुतगती मार्ग विस्तार, मुंबई पारबंदर प्रकल्प मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गाला जोडणे, खाडी पूल, भुयारी मार्ग, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.

एमएमआरडीएच्या २०२१-२२ या वर्षांच्या सुधारित अर्थसंकल्पानुसार एकूण उत्पन्न ८६७२ कोटी रुपये जमा होणार आहे. तर १४५८८.०२ कोटी रुपये इतका खर्च अंदाजित आहे. २०२२-२३च्या मूळ अर्थसंकल्पात एकूण १०,७२४ कोटी रुपये जमा होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये विविध प्रकल्पावर एकूण १८४०४.६३ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ पाहिल्यानंतर समांथा म्हणाली, “हा चित्रपट…”
या अर्थसंकल्पानुसार मेट्रो प्रकल्पासाठी ६,२५० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षांत १० (गायमुख ते शिवाजी चौक, मिरारोड), मेट्रो ११ (वडाळा ते सीएसएमटी) आणि मेट्रो १२ (कल्याण-डोंबिवली-तळोजा) असे तीन नवीन मेट्रो मार्ग मार्गी लागणार आहेत. या तिन्ही मार्गाच्या कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. नरिमन पॉईंट ते कफ परेड उन्नत मार्गासाठी २०० कोटींची, मुंबई पारबंदर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी जोडण्यासाठी २१० कोटींची, पूर्व द्रुतगती मार्गासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसह मुंबई महानगर प्रेदशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करत या परिसराचा सर्वागिण विकास साधणे हेच मुख्य उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले असल्याचे या अर्थसंकल्पातून अधोरेखित होत आहे.

पारबंदर प्रकल्प मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणार

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाला गती मिळावी यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू) हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच सागरी सेतूवरून पुढे नवी मुंबई ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासही वेगवान व्हावा यासाठी पारबंदर प्रकल्प द्रुतगती मार्गाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी ९५० कोटींचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चिरले ते खालापूर असा ६.५ किमीचा रस्ता बांधण्यात येणार असून यापैकी १.५ किमीचा रस्ता पूर्णत: नवीन असणार आहे. या कामालाही लवकरच सुरूवात करण्यात येणार असून यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button