breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून मनमाड -दौंड विभागाची पाहणी

सोलापूर |

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड- दौंड विभागाची वार्षिक तपासणी केली. या वेळी अंकाई आणि कोपरगाव स्थानकांदरम्यान ताशी १३० किलोमीटर वेगाच्या चाचणीने निरीक्षणाला सुरुवातही केली. तपासणीचा भाग म्हणून लाहोटी यांनी कोपरगाव आणि अहमदनगर स्थानकातील प्रतीक्षागृह, स्टेशन स्टॉल, बुकिंग कार्यालय व परिसराची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी महिला प्रतीक्षालय आणि ब्रेस्टफीडिंग रूम, ट्रॅक जॉमेट्री रेकॉर्डिग ट्रॉली, गँग हट्स, क्रू लॉबी, कोपरगाव येथील रिनग रूम, पुणतांबा येथील रिले रूम आणि ट्रॅक मशीन तसेच अहमदनगर येथील रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट, टीआरडी डेपो, आरपीएफ बराकीचीही पाहणी केली.

कोपरगाव येथे लाहोटी यांनी विविध विभागांच्या प्रदर्शनांना भेट दिली आणि आपत्ती व्यवस्थापन, राजभाषा विभागाची ई-पत्रिका आणि लेखा विभागाच्या ई-एसबीएफ मॉडेलचे प्रकाशन केले. त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार आशुतोष काळे यांचीही भेट घेऊन रेल्वेशी संबंधित समस्यांवर चर्चा केली. महाव्यवस्थापकांनी पुणतांबा – अहमदनगर विभागातील ओएचई पॅरामीटर्ससह मुळा नदीवरील गर्डर पुलाची पाहणी केली. अहमदनगर येथे त्यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली आणि रेल्वेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यांनी अहमदनगर-दौंड विभागाची मागील खिडकीद्वारे निरीक्षण केले. नंतर सोलापूर येथे लाहोटी यांनी कोचिंग डेपो आणि सेल्फ प्रोपेल्ड अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनची पाहणी केली. या वेळी सोलापूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व इतर अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button