breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 4,192, पुण्यात 11,872 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45,39,553 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 66,159 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 771 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 68,537 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 45,39,553 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 67,985 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 37,99,266 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,70,301 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील चार आठवड्यांपासून सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र २६ एप्रिलपासून ५ हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने मुंबईला काहीसा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात मुंबईत 4,192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 82 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 5,600 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,44,699 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 13,072 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 5,66,051 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 64,018 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात गुरुवारी 11,872 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 8,29,505 वर पोहोचली असून काल दिवसभरात 163 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 12,925 इतका झाला आहे. तसेच काल 9,337 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह पुण्यात आतापर्यंत 7,20,121 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 4,895, पिंपरी-चिंचवडमधील 2,516, ग्रामीण भागातील 3,554 आणि 907 कंटेनमेंट झोनमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button