breaking-newsराष्ट्रिय

निर्भया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात

दिल्ली | महाईन्यूज

निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात मृत्यूदंड सुनावण्यात आलेल्या चौघांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला देण्यात आलेल्या स्थगितीविरुद्ध केलेली याचिका फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहेत.

केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी गुरुवारी हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी एन. व्ही. रमण, संजय खन्ना व कृष्ण मुरारी या न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे मांडले. दोषींच्या फेरविचार याचिका फेटाळण्यात आल्या असून, त्यांच्यापैकी तिघांच्या क्युरेटिव्ह याचिका व दया याचिकाही नाकारण्यात आल्या आहेत. मात्र तरीही त्यांच्या फाशीची अंमलबजावणी करण्यास तुरुंगाचे अधिकारी असमर्थ आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या चौघाही दोषींना स्वतंत्रपणे नव्हे, तर एकाच वेळी फाशी द्यावी असा निर्णय देतानाच, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दोषींना उर्वरित कायदेशीर उपाय चोखाळण्यासाठी एका आठवडय़ाची मुदत दिली होती. आतापासून सात दिवसांत दोषींनी कुठल्याही याचिकेचा पर्याय निवडला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी विलंब न करता कायद्यानुसार हे प्रकरण हाताळावे, असेही न्यायालयाने सांगितले होते. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही तासांतच केंद्र सरकारने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button