breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याणच्या 4 वर्षांच्या ओम ढाकणेने सर केला अवघड ’मोरोशीचा भैरवगड‘

 

कल्याण | प्रतिनिधी
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात अवघड समजला जाणारा किल्ले मोरोशीचा भैरवगड सर करण्याची अतुलनीय कामगिरी करून दाखवली आहे.गेल्या वर्षीच ओमने महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून कल्याणचा श्री मलंगगड सर करून यशाला गवसणी घातली होती. ह्यावेळी त्याने त्याने अवघड असा मोरोशीचा भैरवगड सर करून कल्याण शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा कौतुकाचा तुरा रोवला आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाखाली मोरोशी गावाच्या बाजूला सुमारे 4 हजार फूट उंच, चाळीस-पन्नास फूट रुंद, असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर असून आजूबाजूला सरळसोट कडे आणि डोकावले की चक्कर यावी इतकी खोली, भर दुपारी ही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार आहे. त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्या बाजूच्या पोटात कोर असा हा भीमरूपी कडा आहे. कल्याणचा सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर हा संघ सह्याद्रीच्या खोर्‍यात धाडसी मोहिमा नित्यनेमाने आखत असतो आणि संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकुले ह्यांनी ओमला सहकार्य केले.रात्री एक वाजता मोरोशी ह्या गावातून ट्रेकला सुरुवात झाल्यानंतर जंगलातील वाट तुडवत मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवर सुमारे 3 ला पोहचल्या. नंतर तिथे थोडा आराम करून पुन्हा एकदा कड्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी सुमारे 1 तासाचा ट्रेक केला आणि सकाळी हा गड चढत चिमुकल्या ओमने तो सरकरूनही दाखवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button