breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“…मग सांगा चुकलं कोण?”; शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन मोदी, शरद पवारांच्या फोटोसहीत झळकला मनसेचा बॅनर

बीड |

अरबी समुद्रामधील प्रस्थावित शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. बीडमध्ये मनसेच्यावतीने बॅनरबाजी करुन देशातील या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलंय. बीडचे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटेंच्या पुढाकाराने गेवराई शहरामध्ये झळकावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान मोदी, शरद पवारांबरोबर राज ठाकरेंचाही फोटो झळकताना दिसतोय. अरबी समुद्रामधी शिवस्मारकाचे काम अद्यापही रखलेलं आहे. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यावेळी संपूर्ण देशभरात पंतप्रधानांनी केलेल्या भुमीपुजनाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमचे सरकार आल्यावर आम्ही प्रथम शिवस्मारकाचे काम करु असे सांगितले होते, अशी आठवण मनसेनेनं बॅनरच्या माध्यमातून करुन दिलीय.

मोदी आणि पवार या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या स्मारकाबद्दल दिलेली आश्वासनांनंतर अद्यापही अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रतिक्षेत असल्याचा निषेध मनसेनं नोंदवला आहे. निषेध म्हणून मनसेच्या वतीने बीडच्या गेवराई शहरात बॅनर उभारुन, ‘…मग सांगा चुकलं कोण?’, असा सवाल विचारला आहे. मनसेने शिवस्मारकाच्या मुद्द्यावर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे आंदोलन केल्याचं म्हटलं आहे. स्मारकाचे काम हे समुद्रात असल्याने कठीण आहे. तत्पुर्वी महाराजांचे गड किल्ले सुरक्षीत ठेवा असे मत स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. मात्र त्यावेळी राज ठाकरे महाराजांच्या स्मारकाला विरोध करत असल्याचे अनेक पक्षांनी म्हटले मात्र आता भुमीपूजन होऊनही स्मारक पुर्ण झालेले नाही त्यामुळे आता चुकलं कोणाचं हे खरोखरच जाणुन घेणे गरजेचे आहे, असं मत राजेंद्र मोटेंनी व्यक्त केलंय.

या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर २०१६ रोजी भूमीपूजन केल्याचा फोटो छापण्यात आलाय. बरोबरच पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी हा कार्यक्रम पार पडला होता. त्याच पार्श्वभूमीवर, “आज पाच वर्ष झाली आतापर्यंत अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?”, असा प्रश्न मनसेनं मोदींना विचारलाय. मोदींच्या बाजूला शरद पवारांचा फोटो असून त्याखाली, ‘२००९ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात पहिले आश्वासन अरबी समुद्रात शिवस्मारक करणार हे होते. १२ वर्ष झाली आतापर्यंत अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?’ असा मजकूर छापण्यात आलाय. या बॅनरच्या सर्वात उजवीकडे राज ठाकरेंचा भाषणामधील पोटो असून त्याखाली, ‘राज ठाकरे म्हणाले होते शिवस्मारक होईल तेव्हा होईल पण शिवरायांचे गड किल्ले महाराजांची खरी स्मारके आहेत आधी ते सुधारा…’ असा मजकूर छापलाय. तसेच, ‘शिवस्मारक करु म्हणत १२ वर्ष झुलत ठेवणार शरद पवार नुसतच भूमिपूजन करुन ५ वर्ष झुलत ठेवणार नरेंद्र मोदी, गड किल्ले सुधारा म्हणणारे राज ठाकरे… सांगा चुकलं कोण?’, असंही बॅनरच्या तळाशी छापण्यात आलंय. विषेश म्हणजे बीडचे आमदार विनायक मेटे हे शिवस्मारकाचे अध्यक्ष असुनही त्यांना स्मारकाचे काम करता आले नाही,असे सांगत मोटे यांनी पंतप्रधान मोदी, शरद पवार आणि विनायक मेटेंवर टीका केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button