breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : ४ सिलेंडरचा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू

पुणे : शहरातील वाघोली परिसरातील उबाळे नगर येथे एका ‘शुभ सजावट’ या मंडपाच्या गोडाऊनला काल (शुक्रवारी) रात्री आग लागली. या आगीत ४ सिलेंडरचा स्फोट झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळाला आहे. अन्यथा पुणे शहर ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते.

घटनेची वर्दी मिळताच पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकुण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. या गोडाऊन जवळच एक रहिवासी इमारत आहे तर दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरचे गोडाऊन आहे जिथे भरलेल्या स्थितीत ४०० गॅस सिलेंडर होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळ असलेल्या रहिवासी इमारतीतील सर्व रहिवाश्यांना इमारतीमधून खाली उतरवले.

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच ४०० सिलेंडरचा साठा असलेले गोदाम आहे. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button