आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत २४ तासांत ३५६८ रुग्ण

शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ रुग्ण आढळले असून जानेवारीत पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण आढळले आहेत.

मुंबई | आठवड्याभरापासून मुंबईतील करोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली येत आहे. १५ जानेवारीला मुंबईत १० हजार रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र ही संख्या ८ ते ५ हजारांवर आली आणि शनिवारी यात आणखी मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ रुग्ण आढळले असून जानेवारीत पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण आढळले आहेत.१ जानेवारीला ६३४७ रुग्ण आढळले आणि पाहता पाहता हा आकडा अवघ्या पाच दिवसांत २० हजारांवर पोहोचला. ६,७,८ जानेवारीला २० हजाराच्या वर रुग्ण आढळले. शनिवारी ४९ हजार ८९५ चाचण्या झाल्या असून यात ३ हजार ५६८ रुग्ण आढळले आहेत. शनिवारी मुंबईत १० मृत्यू झाले असून मुंबईतील एकूण करोनाबळींची संख्या १६ हजार ५२२ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ७४३ करोना रुग्ण आढळून आले, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आढळून आलेल्या २ हजार ७४३ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई ९११, ठाणे ६७२, कल्याण-डोंबिवली ४३१, मीरा-भाईंदर २२९, ठाणे ग्रामीण २१६, उल्हासनगर १३२, अंबरनाथ ८०, बदलापूर ४० आणि भिवंडीमध्ये ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवली पाच, नवी मुंबई तीन, अंबरनाथ दोन तर ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button