breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राम कदमांच्या वक्तव्याने पिंपरी पालिकेत विरोधकांचे “रौद्ररूप”

  • सर्वसाधारण सभेत केला निषेध
  • भाजपने कदमांना घातले पाठिशी

पिंपरी – घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याने गुरुवारी (दि.6) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा संघर्ष लागला. संबंध महिलांचा अवमान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. तर, भाजपने मात्र, स्वपक्षाचे आमदार असल्याने बचावात्मक पवित्रा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांनी सुरूवातीलाच राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. त्यांनी सभेचे कामकाज झाले नाही, तरी चालेल. मात्र, त्यांचा सभागृहाच्या वतीने निषेध करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. या ठरावाला वैशाली काळभोर यांनी अनुमोदन दिले, आणि त्यावरून सभागृहात गोंधळ उडाला.

 

महापौर जाधव यांना ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये, असे म्हटले. त्यावरून विरोधकांनी महापौरांसमोर जावून निषेधाची घोषणा केली. दरम्यान, राम कदम यांच्या निषेधाबरोबर आयुक्तांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना अज्ञानी म्हटल्याने त्यांच्या निषेधाची मागणी भाऊसाहेब भोईरांनी केली. याच चर्चेत आणि आयुक्तांच्या माफीनाफ्यात कदमांच्या निषेधाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष विचलीत करण्यात आले. तर, भाजपकडून सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी कदम यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे नमूद करत स्वकीय आमदार असल्याने त्यांच्याबरोबर आयुक्तांसाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

दत्ता साने यांच्याबाबत आयुक्तांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रवादी, सेनेकडून निषेध केला गेला. त्यावर आयुक्तांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. परंतु, त्याबरोबर कामकाज करताना काही घडले. तर, मिडिया ट्रायल  न करता माझ्याशी बोलावे, असा सल्ला आयुक्त श्रावण हर्डीकरांनी दिला. हर्डीकर यांनी काही चुकत असल्यास न्यायालयात जाण्याचा पर्याय असल्याचे सांगत त्यांनीच न्यायालयात जाण्याचा मार्ग नगरसेवकांना सुचविला. त्याबाबत नगरसेवक आश्चर्य व्यक्त करत होते.

 

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button