breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’ चा दणका : ‘अमृत’ प्रकल्पात ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची दोन दिवसांत बदली!

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील ‘अमृत’ प्रकल्पात ठराविक ठेकेदाराला समोर ठेवून निवेदेतील अटी व शर्ती बदलून शिथील करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित विभागातील कार्यकारी अभियंतासह चार अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तडकाफडकी बदली केली आहे. विशेष म्हणजे, आता सहशहर अभियंता रामदास तांबे यांचीसुद्धा उचलबांगडी करुन ‘चुकीला माफी नाही’ अशी रोखठोक भूमिका आयुक्त बजावतील, अशी अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला हाताशी धरून शहरातील एका आमदाराशी संबंधित (निकटवर्ती) कंपनीला काम मिळावे, यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. तब्बल १२२ कोटी रुपयांचे काम असलेल्या या निविदा प्रणालीच्या अटीशर्तींमध्ये मोठा बदल करण्याचा डाव आहे. विशेष म्हणजे, हा ‘फेरबदल’ महापालिका प्रशासन आणि राजकीय हस्तकांच्या सूचनांनुसार केला जात आहे. याबाबत ‘महाईन्यूज’ ने रोखठोक भूमिका मांडली होती. ” ‘अमृत’मध्ये ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२२ कोटी रुपयांच्या निविदेत फेरबदल? “ अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दोन दिवसांतच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कारवाई केली आहे.

त्यामुळे शहरातील नागरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या ‘अमृत’ योजनेतील तब्बल १२२ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेतील अटी- शर्थी शिथील करून शहरातील आमदाराशी संबंधित कंपनीला ‘रेड कार्पेट’ निर्माण करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांनी आता ‘राजधर्म’ चे पालन करावे, अन्यथा खैर नाही, असा सूचक संदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button