TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी; कुठे पाहाल निकाल जाणून घ्या

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. यंदा १० वी ची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान झाली तर १२वी ची परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र बोर्डाचा पुरवणी निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

१० वी, १२ वीचे विद्यार्थी पुरवणी निकाल अधिकृत वेबसाइट्स- mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in वर पाहू शकतात. इयत्ता १० वी, १२ वीचा निकाल व गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा हॉलतिकीट क्रमांक, व नोंदणीकृत जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे.

कसा पाहाल १० वी, १२ वी पुरवणी परीक्षा निकाल?

  • अधिकृत वेबसाइटवर जा – mahresults.nic.in
  • मुख्यपृष्ठावरील १० वी किंवा १२ वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • हॉलतिकीट क्रमांक व जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करा .
  • तुमचा पुरवणी परीक्षा निकाल तुम्हाला समोर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा
  • इथेच तुम्हाला पीडीएफ प्रिंट करण्याचा पर्याय सुद्धा दिसेल.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेत जवळपास १. ५ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मार्च मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष वाया जाऊ नये याकरिता ही परीक्षा घेतली जाते. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button