ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

३२ दिवस ३८ हजार ६५ लाभार्थी!

विकसित भारत संकल्प यात्रेची उपलब्धी : पिंपरी-चिंचवड भाजपाची मोठे यश

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळावा. या करिता ‘‘विकसित भारत संकल्प यात्रा’’ हा उपक्रम देशपातळीवर हाती घेण्याता आला. हा संकल्प रथाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ दिवसांत तब्बल ३८ हजार ६५ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची उपलब्ध शहर भाजपाने हासील केली आहे.

‘‘विकसित भारत संकल्प यात्रा’’ दि. २८ नोव्हेंबर रोजी दाखल झाली. त्याचा शुभारंभ प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह या ठिकाणी झाला होता. जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिर येथे त्याचा समारोप दि. ३० डिसेंबर रोजी झाला. यावेळी आमदार उमा खापरे, भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड, माजी महापौर माई ढोरे , माजी नगरसेवक विभीषण चौधरी, भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास जिल्हाध्यक्ष अभिजित प्रकाश बोरसे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका शारदा सोनावणे , भाजप शहर उपाध्यक्ष जवाहर सोनावणे, शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी ३० दिवस या अभियामध्ये विशेष काम केलेले अधिकारी मनोज लोणकर आणि महानगपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
भाजपाच्या केंद्रीय स्तरावरून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थींचा प्रतिसाद मिळाला. ३२ दिवसात ६५ ठिकाणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ही यात्रा गेली. विकसित भारत संकल्प यात्रेला लाभार्थी म्हणून भेट दिलेले नागरिकांची संख्या ३८ हजार ६५ इतकी नोंद झाली आहे. यामध्ये आधार कार्ड सेवा – २५६७, आरोग्य शिबीराचा लाभ घेतलेले नागरिक- ९४०६, प्रधानमंत्री उज्वला योजना – २४८७, आयुष्यमान भारत – ५८२३, आभा कार्ड – ४५२३, प्रधानमंत्री स्वनिधी योजना – ३३७९, भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेतलेले नागरिक -१०४१५, मेरी कहानी, मेरी जुबानी – १५२ अशी नोंद झाली आहे.

शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा निर्णायक पुढाकार…
सुरूवातील शहरामध्ये एका दिवशी-दोन ठिकाणी हे अभियान राबवण्यात येत होते. २८ नोव्हेंबर पासून ७ डिसेम्बर २०२३ पर्यंत एका ठिकाणी सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत व दुसऱ्या स्थळी दुपारी २ ते ६.०० वाजेपर्यंत अभियान राबवले जात होते. दि. ८ डिसेंबर रोजी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह कार्यक्रम झाला. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महानगपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक ठिकाणी ही शिबिराची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यास सांगितली आणि त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ झाला, अशी माहिती अभिजित बोरसे यांनी दिली.

भाजपा पदाधिकाऱ्यांचे योगदान…
आमदार उमा खापरे यांच्या उद्बोधनामुळे शहर भाजपाची महिलाशक्ती सुद्धा मोठ्या उत्साहाने या अभियानामध्ये उतरली. सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर यांनी यात्रा सुरु झाल्याबरोबर शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा यशस्वी करण्याकरिता शहर कार्यकर्त्यांना आवाहन केले. जास्तीत-जास्त नागरिकापर्यंत लाभ पोचविण्याकरिता या यात्रेचे संयोजक, भाजप पंचायत राज विभागाचे जिल्हा संयोजक अभिजित बोरसे आणि माजी नगरसेववक विभीषण चौधरी यांनी विशेष प्रयन्त केले आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विशेषतः भाजप पंचायत राज विभागाचे पिंपरी विधानसभा संयोजक मनोज शिंदे, जिल्हा सहसंयोजक अखिलेश भालेकर, शुभम कातंगळे , रोहन चव्हाण, मधुराताई खाडिलकर , सौ संगीता बालाजी चव्हाण यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण महिनाभर प्रयत्न केले आहेत.

‘‘शेवटच्या घटकाचा विकास’’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ब्रिदवाक्य आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘‘विकसित भारत संकल्प यात्रा’’ पिंपरी-चिंचवडमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली शहरात शतप्रतिशत लाभार्थी निश्चित करण्याचा आमचा संकल्प आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button