breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण; शशी थरुर निर्दोष मुक्त

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांना दिल्लीतील न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणाच्या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. परंतु यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीच्या एका बड्या हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी सापडला होता. त्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या पतीचे पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत संबंध असल्याचे सांगितले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे या प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा शशी थरुर यांच्या विरोधात पोलिसांनी नोंदवला होता. हा खटला न्यायालयात सुरू होता. परंतु त्यात थरूर कुठेही दोषी आढळले नसल्याने न्यायालयाने त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button