breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

3 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी, (महाईन्यूज) – शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ७५ लाख ८१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. अ, ब, क, ई, फ व ग या क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी कचराडेपो वाहतुक करणे कामी येणा-या सुमारे १ कोटी ३६ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • ड क्षेत्रिय कार्यालयातील सर्व कचरा उचलणे व वाहतुक करणेकामी येणा-या सुमारे ४० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रिय कार्यालयातील सर्व कचरा उचलणे व वाहतुक करणेकामी येणा-या सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली असून पवना व इंद्रायणी नदीपात्रातील हायसिंथ जलपर्णी काढणेकामी येणा-या सुमारे २ लाख रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आरोग्य वैदयकीय अधिकारी यांना कार्यालयीन वापराकरिता टाटा मोटर्स लि.यांचे करीता नविन वाहन खरेदीकामी येणा-या सुमारे ५ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र शासनाचे धोरणानुसार सीएसआर प्रणाली राबविणेसाठी सल्लागार मानधनकामी येणा- या सुमारे ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थापत्य विभागाकडील मनपाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा विभागामार्फत भरवण्यात येणा-या स्पर्धा सांठी मंडप व्यवस्था करणे साठी रक्कम रूपये ४१ लाख ४७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली असून मनपाच्या प्रभाग क्र. २ मधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी रक्कम रूपये ३१ लाख २० हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत १८ माध्यमिक विदयालयातील पौंगडावस्थेतील विदयार्थ्याना भावनिक सामाजिक शिक्षण पध्दतीवर प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविणेकामी येणा-या सुमारे ९३ लाख र रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button