TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कर्नाक पूल पाडण्यासाठी २५ तासांचा ‘मेगा ब्लॉक’?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – मशीद बंदर स्थानकादरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यासाठी सुमारे २५ तास किंवा त्याहून अधिक कालावधीचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्याचे नियोजन मध्य रेल्वे करीत आहे. त्यासाठी काही मेल, एक्स्प्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून हा पूल ९० दिवसांत पाडण्याचे आव्हान मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेसमोर आहे.

आयआयटी, मुंबईने केलेल्या संरचनात्मक तपासणीत रेल्वेच्या हद्दीतील हँकॉक, कर्नाक उड्डाणपुलासह अन्य काही उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार हँकॉक पूल पाडून नवीन पुलाची उभारणी करण्यात आली असून हा पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यावरून वाहतूक नुकतीच बंद केली. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मध्य रेल्वे हा पूल पाडणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button