breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

४० प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन २१ जणांचा मृत्यू

Kerala Boat Tragedy : केरळच्या मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी सायंकाळी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २१ वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शोधकार्य अजूनही सुरु असून बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही पाहा – पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचे धोनीबाबत मोठं विधान; म्हणाला..

या अपघातानंतर राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार व्हावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button